ऊस उत्पादनासाठी ‘माती’ वाचवा – शास्त्रज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांचे प्रतिपादन

शिरोळ:राम आवळे 
दि .१८:”शेतीची माती वाचवली तरच ऊस उत्पादनात वाढ शक्य आहे. माती, बियाणे, खतांचे व्यवस्थापन आणि योग्य डोस यांचा समतोल साधूनच अधिक उत्पादन घेतले जाऊ शकते,” असे स्पष्ट प्रतिपादन पुणे येथील एस. व्ही. ॲग्रो सोल्युशनचे डायरेक्टर व शास्त्रज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांनी केले.येथील राजर्षी शाहू वाचन मंदिर सभागृहात, श्री दत्त शेतकरी साखर कारखाना यांच्या वतीने ऊस उत्पादन वाढीबाबत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे यांनी स्वागत केले.

डॉ. पाटील म्हणाले, “ऊस हे शाश्वत पीक असून त्यात गुंतवलेला पैसा परत येतोच. तो बुडाला तरी गाळप होते. त्यामुळे ऊस व्यवसायात अधिक शेतकरी येणे आवश्यक आहे.” त्यांनी माती आरोग्य, खत व्यवस्थापन, जीवाणूंची भूमिका याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन केले.दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले, “ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग व उपक्रम राबवले जात आहेत. शेतकऱ्यांनी शेतीचा सखोल अभ्यास करून नवे तंत्र आत्मसात करावे. जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.” त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासनही दिले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये –
दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक अनिलराव यादव, मंजूर मेस्त्री, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने-देशमुख, धनाजी पाटील-नरदेकर, बाळासाहेब कोळी, आनंदराव माने-देशमुख, बापूसो गंगधर, भगवान आवळे, पांडुरंग माने, आप्पासाहेब बंडगर, दिलीपराव माने, विजय देशमुख, आप्पासाहेब गावडे, डॉ. दगडू माने, आयुब मेस्त्री, तसेच मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय शिरोळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.