ग्रामीण साहित्य संमेलनात सचिन तिगडी यांचा गौरव

इचलकरंजी: अन्वर मुल्ला 

दि. २३ :बेळगिहाळ येथे कै. बसवंत नाणू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात इचलकरंजी येथील सचिन तिगडी यांनी सहभाग घेतला. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आयोजकांनी त्यांना सर्वोत्कृष्ट व्हिडिओग्राफर पुरस्कार देऊन गौरविले.

सचिन तिगडी यांनी मागील काही वर्षांत केलेल्या व्हिडिओ निर्मितीच्या कार्यात सातत्य आणि गुणवत्ता कायम ठेवली आहे. त्यांच्या योगदानाचे कौतुक करत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे होते. यावेळी दत्तात्रय पाटील, डॉ. सुमित्रा पाटील, डॉ. दिलीप नेवसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. डॉ. विराट गिरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वि. गो. वडेर यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड. प्रीती हट्टीमणी यांनी केले

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!