यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित
मुंबई: प्रतिनिधी
दि.४: यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी आय.आर.बी.एम.पी.ई.पी.एल.मार्फत पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित टोल नाक्यांवर तात्पुरत्या स्वरूपात टोलमुक्त प्रवेश व निर्गमन सुविधा देण्यात आली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.