कडवईत तिरंगा रॅलीचे आयोजन

 कडवई:   दीपक तुळसणकर,

दि .१३  : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच भाईशा घोसाळकर ज्युनिअर कॉलेज,, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल आणि काळसेकर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कडवई ग्रामपंचायत कार्यालय ते कडवई बाजारपेठ या मार्गावर काढण्यात आलेल्या रॅलीत देशभक्तीपर गाणी, घोषणा आणि तिरंग्याच्या लाटांसह परिसर दुमदुमला. भारत सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून ही रॅली पार पडली.

या प्रसंगी कडवईचे उपसरपंच, पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सदानंद ब्रीद, भाईशा घोसाळकर हायस्कूलचे पर्यवेक्षक , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!