पूर्वा असोसिएटच्या वतीने ‘दिवाली मिलन’ स्नेह मेळावा उत्साहात
इचलकरंजी :हबीब शेख दर्जी
दि.२५ : पूर्वा असोसिएटच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही बिर्ला शक्ती व अल्ट्राटेक सिमेंट विक्रेत्यांचा ‘दिवाळी मिलन स्नेह मेळावा 2025’ मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील तोष्णीवाल गार्डन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.या मेळाव्यास कंपनीचे नॅशनल सेल्स हेड मुदस्सर शेख, रिजनल सेल्स हेड निशाद जोशी, ब्रँच हेड जयवंत लोखंडे, तसेच इचलकरंजी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय सातपुते व संस्थापक अध्यक्ष मुसा खलिफा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस हर्षल धूत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर नितीन धूत यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. मुदस्सर शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विक्रेत्यांच्या सहकार्यामुळेच उच्चांकी विक्री शक्य झाली असून, कंपनीच्या यशामागे प्रत्येक विक्रेत्याचे मोलाचे योगदान आहे.” त्यांनी यावेळी कंपनीच्या विविध योजनांची सविस्तर माहितीही दिली.
मेळाव्यादरम्यान विक्रेत्यांसाठी आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्व विक्रेत्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात दीडशेहून अधिक विक्रेते सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवानंद गुरव, ऋषिकेश हंडे, अमोद मकोटे, काशिलिंग मिठारी, जितेंद्र मगदूम, अभिनंदन बलवान, संकेत तारळेकर, शंकर गीते, मंथन उंदुरे, संदीप सारडा, किरण खोत आणि स्वप्निल चौगुले आदींनी परिश्रम घेतले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.