क्रीडा स्पर्धांमध्ये खिलाडू वृत्ती महत्त्वाची- जिल्हाधिकारी अशोक काकडे
मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन
सांगली:-अय्यान पटेल
दि:-१० क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंमधील खिलाडू वृत्ती खूप महत्त्वाची असते. भावी काळात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हीच वृत्ती महत्त्वाची ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज व्यक्त केला.क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली, वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि खा. एस. डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्ट उरुण ईश्वरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सारिका रासकर तसेच राष्ट्रीय हॉकी खेळाडू संजय पाटील, वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, महाराष्ट्राचा अंतिम संघ येथील शालेय हॉकी स्पर्धेमधून निवडला जाणार आहे. खेळाडूंमधील खिलाडू वृत्ती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडुने आपला सर्वोत्तम खेळ करावा. यापुढे मुलींचे सबलीकरणासाठी कराटे प्रशिक्षण यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे सांगून त्यांनी यावेळी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या वाळवा तालुका शिक्षण संस्थेने हॉकीच्या माध्यमातून गेल्या ३५- ४० वर्षांपासून क्रीडा स्पर्धांची जपलेली प्रतिमा परंपरा स्तुत्य आणि अभिमानास्पद असल्याबद्दल कौतुक केले.क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी वाळवा शिक्षण संस्थेने आणि एस. डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्टने अनेक राष्ट्रीय हॉकी खेळाडू घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न उत्स्फूर्तपणे सुरू ठेवल्याबद्दल संस्थेची प्रशंसा केली.प्रास्ताविकात मुख्याध्यापक एस. एल. पाटील यांनी वाळवा शिक्षण संस्था आणि खासदार एस. डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांची आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेल्या खेळाडुंची माहिती दिली.याप्रसंगी प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ. ए. एल. बेलवटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्यभरातील पुणे, अमरावती, क्रीडा प्रबोधिनी पुणे, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर असे ९ विभागांचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धांसाठी संघनिवडीसाठीची निवड समिती, राज्यभरातील खेळाडू, त्यांचे संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक देखील सहभागी आहेत. या स्पर्धेचे संयोजन विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षक सहकारी तसेच संजय चरापले, ताहीर खाटीक, संजय चव्हाण, संजय कबुरे, राजेंद्र खंकाळे, सुहास पाटील, क्रीडा शिक्षक एस. बी. जाधव व सहकारी करत आहेत. खा. एस. डी. पाटील ट्रस्ट व विद्यामंदिर हायस्कूल, ईश्वरपूर यांच्यावतीने राज्यभरातून आलेल्या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.