भ्रष्टाचार विरोधात राजधानीत राष्ट्रीय समेंलनाचे आयोजन!

नवी दिल्ली: प्रतिनिधी
दिनांक ३ जानेवारी २०२६ : देशातील भ्रष्टाचाराविरोधात एकसंघ होत लढा देण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २८ जानेवारीला भ्रष्टाचार विरोधी राष्ट्रीय समेंलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात तसेच प्रशासनातील पारदर्शकतेसाठी लढणाऱ्या सामाजिक संस्था, समाजसेवक तसेच कार्यकर्त्यांना या समेंलनात आमंत्रित केले जाईल, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी दिली (ता.३) दिली. हेमंत पाटील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहेत. अनेक आंदोलन करीत त्यांनी भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडकीस आणले आहेत, हे विशेष.
       महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान तसेच देशातील विविध राज्यातून या समेंलनात भ्रष्टाचार विरोधात लढा देणारे लढवय्ये सहभागी होतील, असे पाटील म्हणाले. समेंलनात भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाला एक नवीन दिशा देण्याचे काम केले जाईल. देशभरातून आलेल्या भ्रष्टाचार विरोधी समाजसेवकांचे मत जाणून घेत, त्यानूसार प्रस्ताव मांडला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.जोपर्यंत भ्रष्टाचार मुळापासून संपत नाही, तोपर्यंत समृद्ध भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. “भ्रष्टाचाराचा अंत करूनच आपण लोकशाही आणि जनतेचा विश्वास वाचवू शकतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. आयएसीच्या वतीने आगामी काळात या मोहिमेला अधिक तीव्र केले जाणार असून जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात येईल, असे पाटील म्हणाले.”भ्रष्टाचार मिटवा, देश वाचवा”, “लाच घेणार नाही आणि देणारही नाही” अशा मुख्य संकल्पनेवर हे समेंलन आयोजित केले जाईल. देशाच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकतेची कास धरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. भ्रष्टाचार ही वाळवी आहे, जी देशाला पोखरत आहे; तिला समूळ नष्ट करा! भ्रष्टाचार थांबवा, लाच नको, कर्तव्य निभवा; देशाला पुढे न्या, एक पाऊल प्रामाणिकपणाकडे, भ्रष्टाचार मुक्तीकडे, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा, लोकशाही मजबूत करा, असे १० सुत्री कार्यक्रम समेंलनातून मांडण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.