मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ केवळ स्पर्धा नसून पुढील पिढ्यांसाठी टिकणारा वारसा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे: प्रतिनिधी

 दि.१७: पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        पुणे येथील जेडब्लू मेरियट हॉटेल मध्ये आयोजित या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते.यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलसामजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळसायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते.पुणे जिल्हा हा इतिहाससंस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेयेथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्यपरंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञानमॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असूनपश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य  स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल. या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

        बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही भविष्यातील अनेक शतकांसाठी टिकणाऱ्या मार्गाची सुरुवात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणालेस्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असूनपर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.यूसीआयच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशा रितीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेलअशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्व रायडर्सनी  खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करण्याचे असे आवाहन केले.       जगभरातील किमान ३५ देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटूव्यवस्थापकप्रशिक्षक  आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पर्धेच्या भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

       स्पर्धेसाठी केवळ रस्तेच नव्हेतर आवश्यक संपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या असूनकामाच्या अंमलबजावणीचा हा वेग अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.गेल्या तीन दशकांतील प्रशासनातील अनुभवात पाहिलेला हा एखाद्या आयोजनाच्या तयारीचा सर्वोच्च वेग असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविक करताना बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही स्पर्धा पुणे व महाराष्ट्राच्या क्रीडापर्यटन आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी मैलाचा दगड ठरेलअसे नमूद केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने केलेल्या तयारीचे कौतुक करीत पुणेकरांनी मोठ्या उत्साहाने या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

       यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णीआमदार उमा खापरेअमित गोरखेराहुल कुलमहेश लांडगेचेतन तुपेहेमंत रासनेशंकर जगतापमहाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरपुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर रामपुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार कुमारपिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीराज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगलेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!