महिलांसाठी भव्य हळदीकुंकू, नागरी सत्कार व पदनियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे 
दि .२८: शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग, राष्ट्रीय महिला कक्ष व ओजस्वीनी वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य हळदीकुंकू, नागरी सत्कार व पदनियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात श्री. तानाजी पोवार, श्री. मनोज साळुंखे, सौ. विध्या मनोज साळुंखे, श्री. दिलीप मुथा, सौ. रजपुते वहिनी तसेच उमल्लिकार्जुन उर्फ बाबासाहेब कोरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 

यावेळी संघटनेच्या विविध पदनियुक्त्यांची घोषणा जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर यांनी केली. त्यामध्ये मुकुंद तारळेकर (शहरमंत्री), वंदना सुतार (जिल्हा सेवा विभाग प्रमुख), मिना माने (शहर सेवा प्रमुख) व ॲड. कु. साक्षी कोरे (ओजस्वीनी जिल्हा संपर्क प्रमुख) यांचा समावेश असून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

हळदीकुंकू कार्यक्रमात २५० ते २७५ महिलांनी सहभाग नोंदविला. उपस्थित सुहासिनींना भांग भरून हळदीकुंकू व वाण देत सन्मानित करण्यात आले. या वेळी संघटनेचे पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हात्तीकर, दत्ता पाटील, मारुती शिंगारे, सचिन यळरुटे, सचिन वडर, अतुल तनपुरे, संजय फातले, कपिल सुतार, राजेंद्र शिंदे, आनंदा मकोटे, तेजस राणे, सागर पोळ, शार्दूल शेटे तसेच महिला विभागातील ललिता ठाणेकर, अंजली पोळ, राखी यळरुटे, दिपाली बेडक्याळे, मिना माने, वंदना सुतार, साक्षी कोरे, सुनिता हात्तीकर, अम्रुता सुतार, संपदा पाटील, छाया म्हेत्रे, कल्पना मुसळे, अनिता मांगलेकर, सुप्रिया ठाणेकर, मंदा मुसळे, कोमल बागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कांदेकर यांनी केले. संघटनेची भूमिका व भावी दिशा श्री. पंढरीनाथ ठाणेकर यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केली. नूतन नगरसेविका सौ. विध्या मनोज साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी मुकुंद तारळेकर यांनी आभार मानले.

या सोहळ्यास मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी संघटनेच्या वतीने आयोजित प्रितीभोजनाचा लाभ घेतला. उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!