इचलकरंजीत दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .३० : आज इचलकरंजीतील गणेश नगर येथील अशोकराव जांभळे जनसंपर्क कार्यालयात समस्त राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, इचलकरंजी शहर (जिल्हा) यांच्या वतीने राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी परिसरात शोकाकुल व भावनिक वातावरण होते.

या दुःखद प्रसंगी माजी आमदार अशोकराव जांभळे साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या सेवाकाळात कै. अजितदादा पवार यांनी नेहमीच प्रामाणिकपणे, निष्ठेने व कर्तव्यभावनेने शासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध व वक्तशीर नेतृत्व गमावले आहे.
या शोकसभेला माजी आमदार अशोकराव जांभळे साहेब, बाळासाहेब देशमुख, तोफिक मुजावर, शिवाजी शिंदे, राजू खोत, इस्माईल समडोळे, सचिन कांबळे, सौ. प्रिया ताई, सौ. मनाली नंदुरकर, दशरथ माने, समीर मुजावर, सलीम मोटरवाले, जनार्दन गोडसे मामा, सौ. बानूबी पठाण, वसंत पाटील, रमेश कांबळे, रमेश देसाई, बाळ सावंत, आलम देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शोकसभेच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.