बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीला मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ’ राष्ट्रीय अवॉर्ड
इचलकरंजी –विजय मकोटे
दि.०४ : बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सर्व सेंटरमध्ये सर्वाधिक मेंबर ग्रोथ केल्याबद्दल इचलकरंजी सेंटला ‘मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ’ या राष्ट्रीय पातळीवरील अवॉर्डने गौरविण्यात आले. इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट प्रताप साळुंखे यांनी स्विकारला. गोवा येथे संपन्न राष्ट्रीय कॉन्व्हेन्शन कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा पार पडला. बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंग व महाराष्ट्र राज्य चेअरमन जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडीया ही बांधकाम क्षेत्रातील बिल्डर्स डेव्हलपर्स सप्लायर्स यांची अखिल भारतीय स्तरावरील संस्था आहे. बांधकाम व्यावसायिकांना विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही संस्था मदत करते. या संस्थेशी इचलकरंजी सेंटर संलग्न असून मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथसाठी इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान, ट्रस्ट चेअरमन नितीन धूत व सर्व संचालकांनी प्रयत्न केले.याप्रसंगी रमेश मर्दा, शितल काजवे, संजय रुग्गे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.