परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाने सामोरे जा व स्वत: यशवंत व किर्तीवंत व्हा – मा.श्री.बी.बी.भंडारेसाहेब

कबनूर : हबीब शेख दर्जी 

दि .३१ : श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,सौ कुसुमताई बाल मंदीर, प्राथमिक विद्यामंदीर,मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात एस.एस.सी. व एच.एस सी. च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतनपर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी शिक्षणअधिकारी मा.श्री.बी.बी.भंडारेसाहेब होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शितलकुमार मणेरे तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मा.श्री.मनोज हिंगमिरे होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे, संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.अनिलकुमार मणेरे, सौ.ज्योती मणेरे, सौ.साक्षी मणेरे, संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोक वसगडे सर, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ.पुष्पा ऐनापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे मा.श्री.भंडारेसाहेब यांनी “परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाने सामोरे जा व स्वत: यशवंत व किर्तीवंत व्हा" अशा शुभेच्छा
दिल्या. त्याचप्रमाणे विविध उदाहरणाद्वारे कठीण परीस्थीतीतही एखादी समस्या कशी सोडविली पाहिजे याचेही मार्गदर्शन केले. हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे यांनी “परीक्षेच्या सर्व सूचना विद्यार्थ्यांना दिल्या” त्याचप्रमाणे संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोक वसगडे सर यांनी “आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण व सराव यांचे नियोजन असावे लागते. तसेच मा.श्री.शीतलकुमार मणेरे यांनी,विद्यार्थ्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इतर सर्व ट्रस्टींनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.केतकी काळे प्रास्ताविक सौ. दिपाली चौगुले व आभार सौ. श्वेता लाटणे यांनी केले. याप्रसंगी हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, सर्व विभागाचे विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!