डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.२: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षा २०२५ मध्ये डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागाने उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक उत्कृष्टतेची ठाम छाप उमटवली आहे. टेक्स्टाईल डिप्लोमाच्या तिन्ही विभागातून श्रेय शैलेश गजमल ९३.६५ टक्के गुण मिळवत संपूर्ण डिप्लोमा विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेत संस्थेतील ८५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर १२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, हा भरीव निकाल डीकेटीई संस्थेची गुणवत्ताधिष्ठित शिक्षणप्रणाली, सातत्यपूर्ण अध्यापन व निकालभिमुख दृष्टिकोन अधोरेखित करणारा आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत व चिकाटी, अनुभव आणि तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, अभ्यासकेंद्रीत व शिस्तबध्द शैक्षणिक वातावरण, अद्ययावत प्रयोगशाळा सुविधा तसेच संस्थेची दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक धोरणे यांचा मोलाचा वाटा आहे.डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चर्स विभागातील प्रथम वर्षात- दर्शन श्रीश्रीमल ९०.४७ टक्के, सोहम मर्दा ८३.६५ टक्के, यश चितलांगिया ८३.५३ टक्के, द्वितीय वर्षात – आर्यन जाधव ९१.७७ टक्के, साकिब नदाफ ८९.१८ टक्के, प्रांजल मगदूम ८७.४१ टक्के, तृतीय वर्षात – शंतनू केस्तीकर ८९.६८ टक्के, राजवर्धन काकडे ८८.९५ टक्के, अरुष दिंडे ८५.६८ टक्के अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. संस्थेतील डिप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी विभागात दृष्टी उमारानिया ८०.४७ टक्के, मुजामिल मिस्त्री ७८.९४ टक्के, समकित चंगेडिया ७७.२९ टक्के, द्वितीय वर्षात प्रकाश घटटे ९०.५९ टक्के, मलिकरेहान कलावंत ८९.४१ टक्के, कार्तिक बद्रीकोठीमठ ८६.९४ टक्के, तृतीय वर्षात श्रेय गजमल ९३.६५ टक्के, शुभांगी कुंभार ९१.८८ टक्के, रेहान नायकवडी ९१.४१ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. तसेच डिप्लोमा इन फॅशन अँण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी विभागात प्रथम वर्षात- आदिती साखरे ८५.१८ टक्के, सुपर्णा पाटील ८२.२४ टक्के, मादिया बोरकर ८०.७१ टक्के, द्वितीय वर्षात- प्रतिभा मगदूम ९०.०० टक्के, ईश्‍वरी रंगापुरे ८५.०६ टक्के, समिक्षा वसवाडे ८२.५९ टक्के, तृतीय वर्षात- आरती जाधव ८७.४१ टक्के, पूर्वा जाधव ८६.३५ टक्के व श्रेया सरबी ८१.०६ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, व सर्व ट्रस्टी यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ एल.एस.अडमुठे, उपप्राचार्य डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख प्रा.आर.के.वळसंग सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!