महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर
सांगली: अय्यान पटेल
दि.५:महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2025 चा अंतिम निकाल दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2025 ही दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडली होती. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 19 डिसेंबर 2025 रोजी प्रसिध्द झाली होती. प्राप्त हरकतीच्या अनुसार अंतिम उत्तरसूची दि. 12 जानेवारी 2026 रोजी व तद्नुषंगिक शुध्दीपत्रक दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)- 2025 चा अंतिम निकाल दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.