महाशिवरात्री निमित्त रत्नागिरीत ‘आरंभ’ गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन

रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.१०:महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त रत्नागिरी शहरात धनश्री कलेक्शन ग्रुपतर्फे ‘आरंभ’ या नावाने गृहोपयोगी वस्तूंचे विक्री प्रदर्शन (एक्झिबिशन) आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवार व रविवार, दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत श्री भैरव मंगल कार्यालय, श्री भैरी मंदिर परिसर, रत्नागिरी येथे होणार आहे.
या प्रदर्शनात विविध प्रकारचे कपडे, घरगुती व पारंपरिक खाद्यपदार्थ, मातीची भांडी, मसाले, गिफ्ट आर्टिकल्स तसेच दैनंदिन वापरातील आकर्षक गृहोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी दर्जेदार व वैविध्यपूर्ण वस्तू उपलब्ध होणार असल्याने नागरिकांसाठी ही एक उत्तम खरेदीची संधी ठरणार आहे.समस्त रत्नागिरीकरांनी या ‘आरंभ’ प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आग्रहाचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे संयोजन श्रीमती धनश्री धनंजय पालांडे व त्यांच्या टीमतर्फे करण्यात आले आहे.
 
स्थळ : श्री भैरव मंगल कार्यालय, श्री भैरीबुवा मंदिरासमोर, रत्नागिरी.
संपर्क : श्रीमती धनश्री धनंजय पालांडे, 
मो- 9921879660

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!