३५० व्या शहीदी समागमानिमित्त समाज प्रतिनिधींची बैठक

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.१६:‘हिंद दि चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षपूर्तीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील शिख, सिंधी व शिकलगार समाज प्रतिनिधींची बैठक उत्साहात पार पडली.
शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने शालेय स्तरावर गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित गीतगायन, प्रभातफेरी, निबंध स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत खारघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातून मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.शासन निर्देशानुसार शहरातून जाणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले.बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, विजय राजापुरे, दिलप्रीत सिंग, प्रकाश पंजवानी, शंकर मुलचंदानी, भारत लखमानी, सुरींदर मंगानी, आम्रपाल सिंग कोहली, श्याम गुरुनानी, उत्तम सिंग बग्गा, पवन दीप सिंग, मनीष केसवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.