रत्नागिरीत पाण्याचे मीटर चोरी प्रकरण उघड; आरोपी अटकेत
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि .१०.: मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याचे मीटर चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या प्रकरणी प्राप्त तक्रारींच्या आधारे रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई करत एका आ अटरोपीसक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले मीटर हस्तगत करण्यात आले आहेत.रत्नागिरी येथील बी.एस.एन.एल. कार्यालय परिसरातून दि. २४ व २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तीन पाण्याचे मीटर चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दि. ६ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपास करताना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दि. ६ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित साहिल संजय जाधव (वय २५, रा. फगर वठार, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने बी.एस.एन.एल. कार्यालय परिसरातील तीन पाण्याचे मीटर चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला रात्री ११.४५ वाजता अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे १ हजार रुपये किंमतीचे तीन पाण्याचे मीटर पंचनामा करून जप्त केले आहेत. तसेच प्राप्त तक्रारींमधील इतर चोरीस गेलेले मीटर हस्तगत करण्याची कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, आरोपीने चौकशीदरम्यान रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्र. ३४६/२०२५ अंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याची कबुली दिली असून त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पो.उनि. सागर शिंदे, सपोफी दीपक साळवी, पोहेकॉ अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर आणि अमित पालवे यांनी केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.