सांगली:प्रतिनिधी
दि:०३;Jan: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे, तहसीलदार लीना खरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार लीना खरात, मंडल अधिकारी अर्चना पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी नितीन कांबळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.