इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.५ :सभासद, ठेवीदार आणि हितचितकांचे सहकार्य आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर बँकेची ३० वर्षांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. अहवाल सालात बँकेच्या एकुण ठेवी ३०६ कोटी रुपये व कर्ज वाटप २३३ कोटी रुपये केले आहे. या स्पर्धेच्या युगातही बँकेने ६०० कोटींचा व्यवसाय केला आहे. सन २०२२ पासून आरबीआयच्या नियमानुसार एआरसी ला विक्री केलेल्या कर्जाच्या रक्कमेवर प्रत्येक वर्षी २० टक्के तरतुद करावी लागत आहे. आर्थिक वर्षात एआरसीची तरतुद केल्याने ढोबळ नफा होवूनही नफा दिसत नाही. पण कर्जदार सभासदांनी नियमीत कर्जाचे हप्ते व व्याज भरून सहकार्य करावे, असे प्रतिपदान सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सुनिल पाटील यांनी बँकेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.
बँकेची चौफेर प्रगती सुरू असताना काही मंडळींकडून समाज माध्यमातून बँकेसंदर्भात तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात असल्याचे सांगत चेअरमन पाटील यांनी, याबाबतची सविस्तर माहिती रिझर्व बँकेस कळविली असून विघ्नसंतोषींना कुठेही थारा देऊ नका असे आवाहन केले. बँकेचा पैसा हा ठेवीदारांचा असून तो थकित खातेदारांकडून व्याजासह पै अन पै वसुल केले जातील, असा विश्वासही व्यक्त केला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दिली. यावेळी प्रमुख अतिथि आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी, बँकेच्या सर्व कर्जखातेदार याना घेतलेले कर्जाची परत फेड वेळेत करावी असे आवाहन केले. यावेळी ऑलम्पिक स्पर्धेत सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन ठराव करण्यात आला. आभार व्हा. चेअरमन एम. के. कांबळे यांनी मानले.
याप्रसंग प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, सुधाकर मणेरे, शामराव नकाते, भूषण शहा ,डॉ. विलास जोशी ,सदा मलाबादे,गजानन होगाडे रावसाहेब खवाटे,संजय पाटील, बसुदे सीए आदींसह बँकेचे संचालक शितल पाटील, पी. व्ही. कडोले, पुरुषोत्तम कुलकर्णी, विठ्ठल चोपडे,आण्णासो मुरचिट्टे, प्रदीप मणेरे, डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, संजय चौगुले, आप्पासाहेब पाटील, महावीर येळरुटे, गिरीष देशपांडे, संदीप माळी, सौ. वसुंधरा कुडचे, सौ. डॉ.निमा जाधव, मनिष पोरवाल,संजय कुडचे, असि.सीईओ समीर मैंदर्गी,बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार आदींसह सभासद उपस्थित होते.