रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि .१० : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये सर्व पालकांनी नवनिर्वाचित शिक्षण रफिक शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कित्येक वर्षांपासून अशी परिस्थिती होती की राजीवली शाळेमध्ये वर्ग सात आणि शिक्षक एक किंवा दोनच असायचे.अशा वेळी तालुक्यातील शाळेच्या मिटींग करीता किंवा इतर कामाबाबत एक शिक्षकांना बाहेर जावे लागत असे, आणि अशा वेळी एक शिक्षक सात वर्गाना शिकवणे शक्य होत नव्हते आणि मुलांचे खुप शैक्षणिक नुकसान होत होते.
परंतु आता परिस्थिती बदलली आहे .पालक आणि विद्यार्थी आनंदात आहेत . शाळेला आता एकदम चार शिक्षक मिळाले आहेत. २०२४ च्या जुन महिन्याच्या सुरवातीस पहीले शिक्षक श्री. शिंदे व श्री. खोत यांची बदली झाली आणि त्या वेळी श्री.गजानन पाटील,श्री.किरण चव्हाण व श्री.अश्विन बगाड. हे तीन नवीन शिक्षक पंचक्रोशीला लाभले. आणि आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चौथे शिक्षक श्री .रफिक शेख शाळेला लाभले. त्यामुळे पंचक्रोशी मधे ग्रामस्थ,पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर कार्यक्रमला उपस्थित उपसरपंच सौ.दिपीका सावंत, पत्रकार श्री.सचिन पाटोळे, मुख्याध्यापक श्री.गजानन पाटील,श्री किरण चव्हाण,श्री अश्विन बगाड,श्री.रफिक शेख, श्री.चंद्रकांत पाटोळे, श्री.जनार्दन पाटोळे, श्री.प्रभाकर सोलकर,सौ.श्रृती पाटोळे, संजिवनी मालप व इतर पालक ग्रामस्थ उपस्थित होते.