राहुल गांधी यांना दिलेल्या धमकीबाबत आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

*देवरुख:

 

महाराष्ट्र प्रदेश अनिवासी भारतीय सेलच्या अध्यक्ष विद्या कदम यांच्या आदेशानुसार, कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना भ्रष्टविर संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलेल्या धमकीबाबत तक्रार करण्यात आली. अनिवासी भारतीय सेलचे महाराष्ट्र सरचिटणीस मानव विवडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सावंत यांना निवेदन दिले. 

 

निवेदनात गायकवाड यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.