श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमन पदी मा. श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले यांची बिनविरोध निवड.

इचलकरंजीः विजय मकोटे 
दि .१२ : येथील श्री आदिनाथ को ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेच्या चेअरमन पदासाठीची निवड सोमवार दि. ११.०८.२०२५ रोजी मा.डॉ. एस. एन. जाधवसो, उपनिबंधकसो, सहकारी संस्था, हातकणंगले यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या प्रधान कार्यालयात होवून मा.श्री.बाळासाहेब पारीसा चौगुले यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. सदर निवडीकरीता संचालक मा. श्री. श्रेणिक मगदूम यांनी चेअरमन पदासाठी श्री. बाळासाहेब चौगुले यांचे नांव सुचविले तर त्यास संचालक मा.श्री. अनिल बम्मण्णावर यांनी अनुमोदन दिले.
सभेमध्ये सभा अध्यक्ष डॉ. एस. एन. जाधवसाो, तसेच बँकेचे व्हा. चेअरमन यांचेकडून नूतन चेअरमन यांचा सत्कार करणेत आला व उपस्थित संचालकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे अध्याक्षी अधिकारी यांचा चेअरमनसो यांचे हस्ते सत्कार करणेत आला. तसेच माजी चेअरमन सुभाष काडाप्पा सर यांचा सत्कार एस. एन. जाधवसो उपनिबंधकसो, हातकणंगले यांनी केले.
सुरूवातीस सभेचे अध्यक्ष व उपस्थित संचालकांचे स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयकुमार उपाध्ये यांनी केले.
बँकेच्या वाटचालीत सहकार महर्षि मा. खा. कल्लाप्पाणा आवाडे (दादा) व लोकप्रिय आमदार प्रकाशराव आवाडे (आण्णा) यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमिच लाभले आहे. सत्कार प्रसंगी नूतन चेअरमन यांनी आपल्या मनोगतात बँकेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय आप्पासो मगदूम यांना अभिवादन करून आपली बँक सक्षम असून पुर्वी पासून गुणवत्ता पूर्ण कामकाज करते तसेच पुढील काळात ही करणार असलेची ग्वाही दिली. तसेच बिनविरोध निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले.
सदर सभेस बँकेचे माजी चेअरमन मा. सुभाष काडाप्पा, विद्यमान व्हा. चेअरमन चंद्रकांत मगदूम, संचालक कुंतिलाल पाटणी, मधुकर मणेरे, चंद्रकांत मगदूम, सुदर्शन खोत, श्रेणीक मगदूम, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे, गुरुनाथ हेरवाडे, सुकुमार पोते, संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले सीईओ जयकुमार उपाध्ये, प्रशासनअधिकारी श्री.जे. बी. चौगुले उपस्थित होते.शेवटी संचालक अनिल बम्मण्णावर यांनी सर्वांचे आभार मानले.