श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इचलकरंजी:विजय मकोटे

दि. 20:श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १९/०८/२५ रोजी इचलकरंजी येथील महेश क्लब येथे संस्‍थेचे सभासद मा. प्रकाश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.संस्था दि. १७ फेब्रुवारी १९९२ रोजी ५०० सभासद, ३ कर्मचारी व १ लाख वसूल भागभांडवलावर स्थापन झाली. अहवाल वर्षाच्या अखेरीस संस्थेकडे २०,६६९ सभासद असून, अधिकृत भागभांडवल ८ कोटी आणि वसूल भागभांडवल ६ कोटी ८० लाख इतके आहे. एकूण ठेवी १३८ कोटी ४९ लाख, तर कर्ज वितरण १११ कोटी २४ लाख इतके झाले आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २४९ कोटी ७३ लाख, राखीव व इतर निधी २० कोटी ९१ लाख, तर गुंतवणूक ५५ कोटी १६ लाख इतकी आहे. अहवाल वर्षात संस्थेला ३ कोटी नफा झाला आहे.

संस्थापक चेअरमन मा. मदनराव कारंडे यांनी अध्यक्षीय भाषणात अहवाल वर्षातील प्रगतीचा चढता आलेख मांडला. त्यांनी सहकार खातेच्या एनपीए तरतुदी, ऑडिट, कर्ज विषयक नियम व सुधारित आदर्श उपविधींची माहिती दिली आणि संस्थेच्या योग्य धोरणांची अंमलबजावणी सुरू असल्याचे स्पष्ट केले. सभेत सभासदांना १०% लाभांश जाहीर केला गेला.

संस्थेने चंदूर शाखेत स्वमालकीची इमारत बांधण्यास सुरुवात केली असून, लवकरच ती पूर्ण होईल. तसेच ९ वी शाखा लबू चौक येथे सुरू करण्याची परवानगी मिळाली असून तिथे ग्राहक सेवेस लवकरच शाखा सुरू होणार आहे. संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना RTGS, NEFT, QR कोड आणि ऑटो-रिन्युअल सुविधाही प्रदान करत आहे.

सभा संचालक संजय घायतीडक यांच्या स्वागत भाषणाने सुरू झाली, तर संचालक सचिन शिंदे यांनी आभार मानले. संस्थेचे जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर यांनी अहवालाचे वाचन केले. सूत्रसंचालन भारत गिरे यांनी केले, तर सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली.

: मा. मदनराव कारंडे (संस्थापक चेअरमन), शिरीष कांबळे (व्हा. चेअरमन), गजानन कडोलकर, सुनिल पाटील, भगवान कांबुरे, विजय बाबर, संजय घायतीडक, कल्लेश्वर वाघमोडे, सचिन शिंदे , सौ. बबिता माछरे, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर.सल्लागार सदस्य: कादर तहसीलदार, शितल दत्तवाडे,, संदीप जाधव, विजय पाटील (शिव), शशिकांत राक्षे, यशवंत दळवी, सुनील शिंदे यादी उपस्थित होते