कबनूर|:हबीब शेख दर्जी
दि. २५ :रौप्यमहोत्सवी इंदिरा महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, कबनूरची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौ. संगीता प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतिक भवन, दिगंबर जैन मंदिर, कबनूर येथे खेळीत वातावरणात पार पडली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थापक स्व. सुधाकर मणेरे मामा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यवस्थापिका सौ. वेदिका देशपांडे यांनी सभेच्या नोटिशीवरील विषयांचे वाचन केले.चेअरमन सौ. संगीता पाटील यांनी वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक व ताळेबंद सादर केला. यावर्षी संस्थेला ६,०१६१८.९० रुपये नफा झाल्याचे सांगत १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.
माजी सरपंच श्री. मधुकर मणेरे मामा यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जवाहर हायस्कूल, जवाहर नगर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सौ. मिता महावीर पाटील व सौ. संगीता चव्हाण यांनी स्व. सुधाकर मणेरे मामा यांच्या स्मृतींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.सभेच्या शेवटी व्हाईस चेअरमन सौ. स्वाती कोले यांनी आभारप्रदर्शन केले.
या वेळी संचालिका सौ. विजया मणेरे, सौ. मंगल काडप्पा, सौ. कांता बडवे, सौ. रेखा झोले, सौ. अनिता कोले, व्हाईस चेअरमन श्री. सुभाष केतकाळे, पद्मश्री वसंतदादा पतसंस्थेचे चेअरमन श्री. ज्ञानदेव बडवे, व्हाईस चेअरमन श्री. संजय केतकाळे, कर्मचारी सुरेखा हेरवाडे, श्री. दिलीप आवळे, श्री. मनोहर मणेरे मामा आदी मान्यवर उपस्थित होते.