इचलकरंजी व्यापारी संस्थेला 60.59 लाखाचा नफा : सुर्यकांत साखरे

इचलकरंजी:विजय मकोटे 
इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेला सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्व खर्च व तरतुदी वजा जाता 60.59 लाख इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे व व्हा. चेअरमन संजय वठारे यांनी दिली.
ते म्हणाले, आर्थिक वर्षात संस्थेचे वसुल भांडवल 69.15 लाख असून सर्व निधी 4.29 कोटी इतक्या आहेत. अहवाल सालअखेर एकुण ठेवी 15.33 कोटी असुन येणे कर्ज 11. 41 कोटी व गुंतवणुक 10.81 कोटी इतकी आहे. संस्थेची थकबाकी नाममात्र म्हणजेच शेकडा 00.28 टक्के इतकी असून एनपीए शून्य टक्के आहे. संस्था विविध कर्ज योजना राबवत असून सोने तारण कर्ज 9 टक्के, चारचाकी वाहन कर्ज 9 टक्के, दुचाकी वाहन कर्ज 11 टक्के, घरबांधकाम-घरखरेदी कर्ज 10 टक्के आहे. संस्था गेली 9 वर्षे सभासदांना सतत 15 टक्के प्रमाणे लाभांश देत आहे.
याप्रसंगी संचालक सर्वश्री विलास गाताडे, दिलीप वणकुद्रे, बाळासाहेव बरगाले, सुभाष तोडकर, विलासराव चव्हाण, आशिष पाटील, सुभाष पाटील, शशिकांत शेटके, संचालिका सौ. सुवर्णा म्हेतर, सौ. भारती शिंदे, तज्ञसंचालक अमर सडगर, धनंजय पाटील, व्यवस्थापक विश्‍वनाथ रोडे उपस्थित होते.