इचलकरंजी :-विजय मकोटे
दि .२५ :येथिल श्री आदिनाथ बँक ही सभासद व ठेवीदारांचा वाढता ‘पाठिंबा’ व ‘विश्वास’ आणि संचालक मंडळाच्या गुणवत्तापूर्ण कामकाजातून परिसरात नावारूपास आलेली बँक आहे. बँकेने ६ शाखांसह कोअर बँकींग सुविधा, मोबाईल बँकींग सुविधा, अद्यावत युपीआय पेमेंट सुविधेसह २४० कोटी एकत्रित व्यवसायासह कार्यरत आहे. बँकेच्या कामकाजाचा उत्तरोत्तर वाढीव कामकाजाच्या व्यापाचा विचार करुन मा संचालक मंडळाच्या विचारातून व सभासदांच्या निर्णय प्रक्रियेतून इचलकरंजीमधील मुख्य चौकालगतच्या आदिनाथ बँकेच्या इमारतीचा विस्तार होणेच्या दृष्टीने बांधकाम करणेचे ठरविले होते. त्यानुसार इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभदिनी सोमवार दिनांक २२/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० या शुभमुहूर्तावर सौ. व श्री. मधुकर देवाप्पा मणेरे या दांम्पत्याच्या शभुहस्ते प्रारंभ करणेत आला.
या कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन मा. सुभाष काडाप्पा, व्हा. चेअरमन मा. बाळासाहेब चौगुले, ज्येष्ठ संचालक मा. कुंतिलाल पाटणी, संचालक मा. सुदर्शन खोत, मा. अनिल बम्मण्णावर, मा. सुकुमार पोते, संचालिक सौ. मंगल देवमोरे सौ. अनिता चौगुले बीओएम सदस्य मा.उमेश कोळी, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जे.बी.चौगुले, मॅनेजर मा. निलेश बागणे यांच्यासह शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.