यड्राव: कयुम शेख
दि . १३ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ऑटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी थायलंड येथील तंत्रज्ञानातील नामांकीत विद्यापीठात तांत्रिक उच्च व अत्याधुनिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. अभियांत्रिकीतील प्रगत तंत्रज्ञान, यासाठी लागणारे प्रगत साधने, आणि
प्रॅक्टीकल बेस टिचिंग-लर्निग पध्दत यावर आधारीत नाविण्यपूर्ण प्रोजेक्ट थायलंडमधील तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केले. त्यांचे व पालकांचे स्वागत संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते करण्यात आले.
जागतिक पातळीवरील प्रगत तंत्रशिक्षणाची विद्यार्थ्यांना माहीती व्हावी या उद्देशाने सी.टी.आय.एफ. यांच्याबरोबर संलग्नतेने अवलंबलेल्या प्रोजेक्ट बेस्ड लर्निग या संकल्पने अंतर्गत यु.एस.ए., डेन्मार्क, थायलंड, बल्गेरीया, इटली, ग्रीस, रशिया, बल्गेरिया आदी देशातील नामांकित टेक्निकल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या देशातून आतापर्यंत ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी फेलोशिप पूर्ण केले आहे.नुकतेच थायलंड येथील सीएएमटी चियांग माई विद्यापीठमध्ये ऑटोमेशन आणि रोबोटिक्स विभागातील समिउल्ला पटेल, यशवर्धन शिरगावे, आदिनाथ तोडकर, अमेय पाटील, इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील मोहम्मदताकी पटेल यांनी अशा नामांकित विद्यापीठात ४५ दिवसाचे उच्च प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षण काळात समिउल्ला पटेल, मोहम्मदताकी पटेल, यशवर्धन शिरगावे, आदिनाथ तोडकर यांनी "कॉम्प्युटर व्हिजन आणि मशीन लर्निंग वापरून ब्लाइंड
स्पॉटवर रिअल-टाइम व्हेईकल डिटेक्शन", तर अमेय पाटील याने “संगणक दृष्टी आणि मशीन लर्निंग वापरून अंध स्थानावर रिअल-टाइम वाहन शोधणे” हे प्रोजेक्ट पूर्ण केले. पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये काम कसे हाताळले जाते आणि कोणत्या अचूकतेने काम केले जाते याचा सुध्दा अनुभव मिळाला. ह्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रोजेक्ट बेसड लर्निंगच्या समन्वयक प्रा. धनश्री बिरादार उपस्थीत होत्या.