इचलकरंजीः विजय मकोटे
दि.८ :येथील श्री आदिनाथ को ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी ची निवड मंगळवार दि.०८.०९.२०२६ रोजी मा.एन.ए.परजणे, उपनिबंधकसो, सहकारी संस्था, हातकणंगले यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या प्रधान कार्यालयात होवून मा.श्री. चंद्रकांत पारीसा मगदूम यांची चेअरमनपदी व मा.श्री. मधुकर देवाप्पा मणेरे यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.
सदर निवडीकरीता संचालक मा. श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले यांनी चेअरमन पदासाठी मा.श्री. चंद्रकांत पारीसा मगदूम यांचे तसेच व्हा. चेअरमन पदासाठी मा.श्री. अभयकुमार आप्पासो मगदूम यांनी श्री. मधुकर देवाप्पा मणेरे यांचे नांव सुचविले तर त्यास अनुक्रमे संचालक मा.श्री. सुभाष आदिशा काडाप्पा व मा. श्री. श्रेणिक दादासो मगदूम यांनी अनुमोदन दिले.सभेमध्ये अध्याक्षी अधिकारी एन.ए.परजणे साहेब व ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते बँकेचे नूतन चेअरमन व नूतन व्हा. चेअरमन यांचा सत्कार करणेत आला व उपस्थित संचालकांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे अध्याक्षी अधिकारी यांचा नूतन चेअरमन मा.श्री. चंद्रकांत पारीसा मगदूम यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.सुरूवातीस सभेचे अध्यक्ष व उपस्थित संचालकांचे स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयकुमार उपाध्ये यांनी केले.बँकेच्या वाटचालीत सहकार महर्षि मा. खा. कल्लाप्पाणा आवाडे (दादा) व लोकप्रिय माजी वस्त्रोद्योगमंत्री मा. प्रकाशराव आवाडे (आण्णा) यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच लाभले आहे.
सत्कार प्रसंगी चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी आपल्या मनोगतात संस्थापक चेअरमन स्व. आप्पासो मगदूम यांचे स्मरण करून आपली बँक सक्षम असून पुर्वी पासून गुणवत्ता पूर्ण कामकाज करते तसेच पुढील काळात ही करणार असलेची ग्वाही दिली. तसेच बिनविरोध निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले.सदर सभेस बँकेचे संचालक मा. सुभाष काडाप्पा, राजू उर्फ अभयकुमार मगदूम, सुदर्शन खोत, श्रेणीक मगदूम, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे, गुरूनाथ हेरवाडे, सुकुमार पोते, संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले उपस्थित होते. शेवटी ज्येष्ठ संचालक श्री. सुभाष काडाप्पा यांनी सर्वांचे आभार मानले.