माजी उपनगराध्यक्षा साधना साळुंखे यांचे निधन

इचलकरंजी: अन्वर मुल्ला 

 दि.८ : इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा श्रीमती साधना विलासराव साळुंखे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.दिवंगत नगराध्यक्ष बापूसाहेब मोरे यांच्या राजकीय विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेत श्रीमती साळुंखे यांनी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. नगरसेविका म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

        याशिवाय, त्यांच्यासमवेत असलेल्या नगरसेविकांच्या एका गटाच्या माध्यमातून महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठीही त्या सक्रियपणे कार्यरत होत्या. महिलांना आधार देत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.त्यांचे पती विलासराव साळुंखे यांनी माध्यम क्षेत्रात दीर्घकाळ काम केले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे यांच्यासह दोन भाऊ, बहिणी असा परिवार आहे.