रत्नागिरी, दि. २८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशी एकूण १६ उमेदवारांनी १९ नामनिर्देशनपत्र दाखल केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
विधानसभा मतदार संघनिहाय नामनिर्देशनपत्रांची माहिती
263- दापोली विधानसभा मतदार संघ
कदम योगेश रामदास (शिवसेना, प्रस्तावकामार्फत दाखल), खांबे ज्ञानदेव रामचंद्र (अपक्ष), खाडे सुनिल पांडुरंग
(अपक्ष), अबगुल संतोष सोनू (महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्ष) अशा एकूण ४ उमेदवारांनी ५ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
264- गुहागर विधानसभा मतदार संघ
फडकले संदीप हरी (अपक्ष), जाधव विक्रांत भास्कर (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे), बेंडल राजेश रामचंद्र (शिवसेना), गांधी प्रमोद सिताराम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), प्रमोद परशुराम आंब्रे (राष्ट्रीय समाज पक्ष) अशा ५ उमेदवारांनी प्रत्येकी १ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
265- चिपळूण विधानसभा मतदार संघ
शेखर गोविंदराव निकम (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) यांनी २ नामनिर्देशनपत्रे, सुनिल शांताराम खंडागळे (अपक्ष) यांनी १ नामनिर्देशनपत्र असे एकूण ३ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघ
सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी १ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
267- राजापूर विधानसभा मतदार संघ
अमृत अनंत तांबडे (अपक्ष), अविनाश शांताराम लाड (अपक्ष), जाधव संदीप विश्राम (बहुजन समाज पार्टी),
राजन प्रभाकर साळवी (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी २ नामनिर्देशनपत्र अशा ४ उमेदवारांनी एकूण ५ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.