कडवई:-(दिपक तुळसणकर)
कडवई ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त महिलांसाठी आरोग्य शिबिर, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला डॉ. आसावरी पाटोळे (प्राथमिक आरोग्य केंद्र), डॉ. अनुराधा नारकर, तुळशीराम पवार (माजी केंद्रप्रमुख, चिपळूण) तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच कुवळेकर मॅडम, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी चौधरी, ग्रा.पं. सदस्य आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता यादव यांनी केले, तर प्रास्ताविक मिथाली कडवईकर यांनी केले. स्वागत गीत राजश्री सावरटकर यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच दत्ताराम ओकटे यांनी आभार प्रदर्शन केले