आरवली – येडगेवाडी रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होताच क्षणी अर्धवट बंद.

संगमेश्वरच्या रस्ते कामात निकृष्ट दर्जा? भाजपा नेत्यांचा आरोप!

रत्नागिरी : सचिन पाटोळे 

रत्नागिरी, १० एप्रिल २०२५  : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४४ वरील २३ ते ३० कि.मी. या ७ कि.मी. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने ३ कोटी ५० लाखांची तरतूद २०२३च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

या कामासाठी आमदार शेखर निकम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एकूण ६ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले. पहिल्या टप्प्यात राजीवली बौद्धवाडी ते येडगेवाडी (२३ ते ३० कि.मी.) या भागात काम सुरू करण्यात आले. हा रस्ता गडनदी मध्यम प्रकल्प आणि परिसरातील पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

मात्र यावर आता वाद निर्माण झाला आहे. भाजपा नेते मा.सुर्यकांत साळुंके यांनी या रस्ते कामावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “या रस्त्याचे खरे महत्त्व गडनदी प्रकल्पाच्या जवळ असलेल्या भागात होते, मात्र काम सुरू झाले ते शेवटच्या टप्प्यावर! त्यामुळे पर्यटकांपेक्षा ठेकेदारालाच याचा जास्त फायदा होणार आहे. शिवाय सध्या सुरू असलेले काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे आहे.”

या कामाची चौकशी लवकरच लावण्यात येणार असल्याचेही साळुंके यांनी जाहीर केले आहे.पर्यटनाला चालना देणाऱ्या या रस्त्याचा दर्जा आणि दृष्टीकोन आता चर्चेचा विषय ठरत आहे!

#sangmeshwer news# road #Ratnagiri