तृतीयपंथी ही सुद्धा माणसं आहेत : शिवानी गजबर

होय ! आम्ही सुद्धा माणसे आहोत, यावर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान

कोल्हापूर :प्रविण भोसले 

दि.९: तृतीयपंथी समाजातील सर्व व्यक्ती ही वयाच्या १८  , १९  वर्षापर्यंत स्त्री किंवा पुरुषच असतात. शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे त्यांच्यात लिंग बदल होतो . या बदलांमुळे कुटुंब या व्यक्तींना बाहेर काढते, नाईलाजाने या व्यक्तींना हिजडा समाजात सामील व्हावे लागते, तृतीयपंथी असणारा हा हिजडा समाज रामायण, महाभारतामध्ये सुद्धा होता. त्यांना तेथे मानाचे स्थान होते. सरकारने २०१४ पासून या समाजाला काही सोई सवलती दिलेल्या आहेत. तृतीयपंथी समाजातील लोकांना आरक्षण द्यावे, समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा, तो सकारात्मक ठेवावा असे आवाहन तृतीयपंथी हक्क संरक्षण कल्याण मंडळ पुणे च्या सह अध्यक्षा शिवानी गजबर यांनी केले.


श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या वतीने आयोजित लिंग समभाव, संवेदना, जाणीव व जनजागृती यावरील, होय! आम्ही सुद्धा माणसे आहोत या विशेष व्याख्यानात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले . समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. एम. देसाई यांनी स्वागत प्रस्ताविक करून कार्यक्रमाचा हेतू विशद केला
यावेळी बोलताना शिवानी गजबर म्हणाल्या , समाजाचे बोलणे, टोमणे यामुळे  मी नाईलाजाने या तृतीयपंथी समाजात आले . वयाच्या १८ ,१९  नंतर शारीरिक मानसिक बदलामुळे आमचेत लिंग बदल झाले. समाजात एल जी एल जी बी टी वर्गवारीत हिजडा समाजात ६४ प्रकारचे लोक येतात. भारतात चार लाख ८० हजार हून अधिक लोकांचा हा समुदाय आहे. संविधानाच्या कलम ३७७ नुसार या समाजाला शासनाने २०१४ नंतर काही सोयी सवलती दिलेल्या आहेत. शासनाने या समाजातील विद्यार्थ्यांना, लोकांना आरक्षण द्यावे. समाजाने या लोकांकडे पाहताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा , आम्ही सुद्धा माणस आहोत.
प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, जगभरात आठ कोटी लोकांपर्यंत तृतीयपंथी समाजाची लोकसंख्या आहे. हा समाज विविध सोयी सुविधांपासून वंचित आहे. माणूस म्हणून जगण्याचा त्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे. आपल्यातीलच ही माणसे आहेत. त्यांना माणूस म्हणून जगू द्या. अशा विशेष व्याख्यानातून माणूस समजून घेण्याची प्रक्रिया घडते .शिवानी गजबर यांनी तृतीयपंथी समाजाचे वास्तव सांगितले आहे.
डॉ. के. एम.देसाई यांनी संयोजन केले.प्रा.पी पी भाटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.व्ही.व्ही.कुरणे यांनी आभार मानले. समाज कल्याण विभाग कोल्हापूरचे समन्वयक सचिन कांबळे, डॉ.आर .डी.मांडणीकर, डॉ.ए.बी..बलुगडे, प्रबंधक आर.जे .भोसले, अधिक्षक मनीष भोसले,ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.