कबनूर उर्दू विद्या मंदिर दावतनगर येथे मुस्लिम बैतुलमाल कमिटीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

कबनूर: हबीब शेख दर्जी 
दि .७: कबनूर येथील उर्दू विद्या मंदिर, दावतनगर येथे मुस्लिम बैतुलमाल कमिटीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक फारूक ढालाईत तसेच अध्यक्ष व मा. मुख्याध्यापक अल्ताफ जकाते सर उपस्थित होते.कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि एकूण ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रोत्साहन निर्माण झाले असून, शाळेतील शिक्षकांच्या अथक प्रयत्नातून उर्दू शाळेतील विद्यार्थी आज राज्य आणि देशपातळीवर कबनूर गावाचे नाव उज्ज्वल करत असल्याचे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.

बैतुलमाल कमिटीच्या वतीने शाळेस भविष्यात लागणारी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.या कार्यक्रमात डॉ. असिफ फकीर, अल्ताफ मुजावर, मोहसीन मुजावर, तोहीद जिनाबडे, रियाज चिकोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचा विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यांनी मेहनतीने शिक्षण घेत आपले नाव गाव, राज्य व देशपातळीवर उजळवावे.”कार्यक्रमाला जावेद इनामदार, तोफीक पटेल, बाबाजान अपराज, इस्माईल शेख, सिद्दीक मुजावर, खतीब, बाबाजान सत्तार आदी मान्यवर तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ताफ शेख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रिजवान चमनशेख यांनी मानले.

# Educational literature distribution #