संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ

इचलकरंजी:विजय मकोटे 
दि .६ : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५  व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांना रविवारी उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धांचे हे ३५ वे वर्ष आहे. श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्यावतीने आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महानगरपालिका आरोग्यधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, डॉ राजन फुटाणे, दिपक राशीनकर उपस्थित होते. प्रारंभी श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  नामदेव समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी प्रास्ताविकात आंतरशालेय स्पर्धांचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रा.अनिल अवसरे यांनी तर आभार युवक संघटनेचे अध्यक्ष संदिप कल्याणकर यांनी मानले.
        इयत्ता१ ली ते १० तील विविध गटात चित्रकला, सामान्यज्ञान, निबंध, बुध्दिबळ, वक्तृत्व , पाठांतर, गायन, वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये इयत्ता १  ली ते १०  मधील विविध शाळांतील सुमारे दिड हजार विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी उमाकांत कोळेकर, चंद्रकांत पाडळकर, अशोक बारटक्के यांच्यासह श्री नामदेव समाज सेवा मंडळ, नामदेव युवक संघटना, महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, समाज बांधव उपस्थित होते.
#Inter-school competitions#Sant Namdev Maharaj Samadhi#