मेट्रो टेक्सटाईल पार्कमध्ये गणेशोत्सव व सत्यनारायण महापूजेला उत्साह

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि .२९ : मेट्रो टेक्सटाईल पार्क येथे गणेशोत्सव आणि सत्यनारायण महापूजा मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोकराव स्वामी उपस्थित राहून त्यांनी सूतगिरणी विभागाची पाहणी केली.

या वेळी आपल्या भाषणात श्री. स्वामी म्हणाले की, “श्री. सुरेश दादा पाटील यांचे चिरंजीव सुहास पाटील यांनी गिरणी काटकसरीने व योग्य नियोजनाने चालवली असून त्यामुळे गिरणी कार्यक्षम रित्या चालली आहे,” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात श्री. अशोकराव स्वामी यांचा सत्कार गिरणी प्रमुख श्री. सुरेश दादा पाटील, श्री. भरत पाटील व श्री. सुहास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या प्रसंगी मेट्रो टेक्सटाईल पार्कचे सर्व संचालक, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक उत्साहाबरोबरच संस्थेतील शिस्तबद्ध व कार्यक्षम व्यवस्थापनाचेही यावेळी कौतुक करण्यात आले.