भटक्या विमु्नतांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहु : आमदार आवाडे

इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.३: इंग्रजांच्या राजवटीत भटक्या विमुक्त जातींना गुन्हेगार ठरवून बंदीवासात ठेवले गेले. देशाला १९४७  साली स्वातंत्र्य मिळाले असले तरी भटक्या विमु्नत जातींना स्वातंत्र्य मिळण्यासाठी १९५२ साल उजाडायला लागले. ३१  ऑगस्ट १९५२ रोजी शासनाने स्वातंत्र्य बहाल केले. त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आपणही भट्नया विमु्नतांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहु, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
अखिल भारतीय विमुक्त घुमंतु आदिवासी महासंघाच्या वतीने ३१ ऑगस्ट हा भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला. राज्य महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुंदराव पोवार यांनी इचलकरंजीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, नायब तहसिलदार संजय काटकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना मुकूंदराव पोवार यांनी भटक्या विमुक्तांचे अजुनाही अनेक प्रश्?न प्रलंबित आहेत. त्याची शासनाने दखल घेऊन ते मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक प्रमोद पोवार यांनी केले.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी भटक्यांचे नेते मुकूंदराव पोवार यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहू, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ. सुमन पोवार, सुनिल पाटील, रमेश पाटील, अनिल कदम, रोहित पाथरवट, नौशाद जावळे, उत्तम पोवार, शशिकांत शिंगाडे, आनंदा पोवार, मारुती बुनांद्रे, चंद्रकांत कोष्टी, मोहन काळे, संजय केंगार, राजाराम नलवडे, रामभाऊ पोवार, लक्ष्मण माने, पांडु पोवार, अरुण निंबाळकर, महादेव कोरवी, करीम सनदी, संजय कोरवी यांच्यासह वडार, गोंधळी, कैकाडी, कोल्हाटी, कोरवी, बेलदार, शिकलगार, घिसाडी, गोसावी, वैदू आदी भटक्या समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.