इचलकरंजी: मनोज खेतमर
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज गुरुवार दि.२१ ऑक्टोबर रोजी इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे (सरकार) यांच्या पुण्यतिथी निमित्त नाट्यगृह चौकातील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास नगराध्यक्षा अँड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अमरजीत जाधव, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सचिन शेडबाळे, दिलीप मगदूम आदी उपस्थित होते.