लांजा तालुक्यातून महिला व दोन मुले बेपत्ता

रत्नागिरी,:नियाझ खान 

दि. २१  : लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी श्रीमती किरण संजय चव्हाण (वय २७ ) या दि. २८  ऑक्टोबर २०२४  रोजी सायं. 5 वाजता आपली मुलगी सृष्टी (वय ६ ) व मुलगा स्वराज (वय ४) यांच्यासह घरातून बाहेर पडल्या असून त्यानंतर तिघेही बेपत्ता झाले आहेत.


श्रीमती किरण चव्हाण यांची उंची सुमारे ५ फुट ४  इंच, गोरा रंग, उभट चेहरा, सरळ नाक, मध्यम केस असे वर्णन आहे. त्या नापत्तावेळी चॉकलेटी टॉप, पांढरा सलवार परिधान केलेल्या होत्या. त्यांच्या गळ्यात छोटे व
मोठे सोन्याचे मंगळसूत्र, हार, कानात सोन्याच्या कुडी, नाकात नथनी, हातात हिरव्या काचेच्या बांगड्या,सोन्याच्या अंगठ्या तसेच पायात चांदीची जोडवी व पैंजण होते. त्यांच्या सोबत चॉकलेटी रंगाची सॅक होती
ज्यामध्ये कपडे व अंदाजे रु. ४४  हजार रोख होते. कपाळावर लाल टिकली होती.मुलगी सृष्टी हिची उंची ४  फुट, रंग गोरा, केस छोटे असून तिने चॉकलेटी टॉप व आकाशी लेगीन्स परिधान केले होते. मुलगा स्वराज याची उंची ३  फुट ४ इंच असून त्याने काळा टी-शर्ट व पॅन्ट परिधान केले होते. त्याच्या कानात सोन्याची एक बाली व पायात चप्पल होती.नापत्ता महिला जवळ पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा (MH-08 AR-0887) आहे.
या तिघांविषयी कोणाला माहिती मिळाल्यास संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.