देवराष्ट्रे येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

 सांगली:अय्यान पटेल 

 दि.८: महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील मूळ निवासस्थानी, जिथे त्यांचा जन्म झालेला आहे त्या घरी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.