दिरा गृहनिर्माण संस्थेची सुवर्णमहोत्सवी सभा उत्साहात….

सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्याचा ठराव मंजूर; ५० वर्षांच्या वाटचालीचा अध्यक्ष दिलीप झोळ यांनी घेतला आढावा

कबनूर :अन्वर मुल्ला 
दि.२०: येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेची ५० वी सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेच्या सुवर्ण-महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासह सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. सभेपुढील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष दिलीप झोळ होते.
उपाध्यक्ष अशोक वसगडे यांनी स्वागत केले. संचालक बाळासो ऐनापुरे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. त्यानंतर सचिव शिवय्या जंगम यांनी सभेची नोटीस वाचन केले. अध्यक्ष दिलीप झोळ यांनी अहवाल वाचन करताना संस्थेच्या पाच दशकांच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने केलेली प्रगती, सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. ऐनवेळी उपस्थित करण्यात आलेल्या विषयांवरही त्यांनी सविस्तर चर्चा करून सभासदांच्या सूचना व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
यावेळी सभासद व अभियंता पिरगोंडा ऊर्फ राजू पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी चेअरमन पांडुरंग राजमाने, राजाराम पोवार, संचालक महमदयुनुस खतीब, सुरेंद्र मगदूम, रामचंद्र भोसले, नसीर सर्जेखान, सुधाकर ताडे, अनिल कुलकर्णी, दत्तात्रय भिलवडीकर, रवींद्र सावंत, विजय देसाई, विजयमाला जाधव, सुनीता शिंगाडे यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक विशाल दास यांनी आभार मानले.