हनुमान मंदिराच्या शिखरकामाचा शुभारंभ

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दिि ३० : जवाहरनगर परिसरातील हनुमान मंदिरच्या शिखर उभारणी कामाचा शुभारंभ कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधीवत पुजा व धार्मिक विधी त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
येथील जवाहरनगर परिसरात असलेल्या हनुमाननगर येथे पुरातन हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम सुर आहे. त्याच अंतर्गत मंदिराच्या शिखर उभारणी कामाचा शुभारंभ स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भागातील नगरसेवक राजु बोंद्रे, मंदिर शिल्पकार शेखर नाईक, सोमेश्‍वर वाघमोडे, आनंदा मकोटे, सुजित कांबळे, सर्जेराव कुंभार, विश्‍वनाथ लोटे, बंडा पाटील, रावसाहेब मगदूम, लक्ष्मण पागडे, सुशील कोळेकर, मारुती गोडसे, सुरेश चौगुले, अनिल तांबे, उस्मान जमादार, शंकर मानकर, संतोष डफळे, नामदेव रेडेकर, संतोष रेडेकर, अभिजित खोत, विशाल खोत, संतोष खवरे, सौ. रुपाली रेडेकर, लक्ष्मी पाटील, संगीता घोरपडे, वैशाली साळुंखे, दिपा लोटे, सुलोचना रेडेकर, सुमन शिंदे, मीना माने, वनश्री गुरव, ललिता पटेकर यांच्यासह भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते.