शिरढोण :प्रतिनिधी
दि:31येथील कृषी अधिकारी अजित कोठावळे यांच्या मनमानी कारभाराबाबत गावातील शेतकरी वैतागले आहेत.सतत गैरहजर राहणे,उद्धट बोलणे,पंचनाम्याबाबत कोणतेही शंका विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या अधिकाऱ्याची चौकशी करून तात्काळ बदली करावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकरी अशोक मगदूम व अनेक शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात कोल्हापूर कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर वाकुरे यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, कृषी अधिकारी कोठावळे हे वारंवार गैरहजर असतात.शिवाय शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्या बाबत ते नेहमी टाळाटाळ करतात.एकाधिकारशाही प्रमाणे या अधिकाऱ्याचे वागणे असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.दरम्यान 2019 व 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यावेळी पंचनामे झाले असून काही करण्याचे पंचनामे राहिले असून काहींमध्ये तांत्रिक चुका झाल्या आहेत.शिवाय पंचनामनामध्ये पिकांची व क्षेत्राच्या नोंदीमध्ये तफावत आहे.हे विचारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही उडवाउडवीची उत्तरे तसेच टाळाटाळ या अधिकाऱ्याकडून होत आहे.त्यांच्या या कारभाराची चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करून शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक शिरढोण येथे करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने या तक्रारीत देण्यात आला आहे.