इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२ : शहापूर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 मधील कलम 56(1)(ब) अन्वये करण्यात आलेल्या कारवाईत त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींविरुद्ध हद्दपार प्रस्ताव सादर करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार पिंटू उपेंद्र रॉय (रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात तीन दखलपात्र व तीन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याचा हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावावर सुनावणी होऊन उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी उपविभाग यांनी संबंधित आरोपीस कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून आजपासून पिंटू उपेंद्र रॉय याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.शहापूर पोलीस ठाण्याने ही कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले आहे.