डायनॅमिक स्पाेर्टस्च्या श्रध्दा धुमाळ हिची जिल्हा संघात निवड

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 
दि.३ : सिन्नर नाशिक येथे हाेणाèया ७३ व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी येथील डायनॅमिक स्पाेर्टस् क्लबच्या कु. श्रध्दा अनिल धुमाळ हिची काेल्हापूर जिल्हा कबड्डी महिला संघात निवड करण्यात आली आहे. कु. श्रध्दा धुमाळ हिने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन तिची राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धेसाठी काेल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन आणि डायनॅमिक स्पाेर्टसब क्लबचे अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, माेहसीन बागवान यांचे प्राेत्साहन लाभत आहे