इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.३: महावीर जन्म कल्याणक महोत्सव तसेच आनंद ऋषीजी महाराज यांच्या स्मृतीदीन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आचार्यश्री आनंद युवा मंचच्या वतीने अखंडीतपणे १७४१ दिवसापासून सुरू असलेल्या आनंद गुरु मोफत चपाती भाजी केंद्रावर गरिबांना मिष्ठान्न वाटप केले. त्याचबरोबर वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पाणपोई चा शुभारंभ करण्यात आला.
रतनसिंह, जतनसिंह, पंकज मेहता यांचे पाणपोईसाठी सहकार्य लाभले. याप्रसंगी स्थानकवासी जैन श्रावक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रितम बोरा, मंत्री राजेंद्र कोठारी, ट्रस्टी प्रेमराज बंब, गौतम मुथा, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती अध्यक्ष सतीश मुळीक, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, दिलीप मुथा, महावीर जन्मकल्याणक समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उदय चौगुले, संजय मगदूम, मोहन चौगुले आदी मान्यवरांसह महावीर जैन, पद्मचंद खाबिया, महावीर बोरुंदीया, प्रकाश बोरा, वसंत बोरा, संजय मुनोत, अशोक गांधी, हंसराज बोहरा, ग्यांनचंद जैन, मनोज चंगेडिया, अशोक सालेचा, संजय सुरपुरे, विलास गांधी व मंडळाचे क्रियाशील सदस्य उपस्थित होते.