इचलकरंजी : विजय मकोटे
दि.३: शहरातील प्रतिथयश अशा दि इचलकरंजी मर्चंटस को ऑप बँक लि;इचलकरंजी या बँकेस नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षात रु.१ कोटी ९१ लाख इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री.राजगोंडा रा.पाटील यांनी दिली.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या एकूण ठेवी रु.१६१ कोटी ४९ लाख इतक्या झाल्या असून रु.९१ कोटी ०५ लाख इतके कर्ज वाटप आहे. बँकेची एकूण गुंतवणूक रु.६४ कोटी ८० लाख इतकी आहे.बँकेचे भाग भांडवल रु.५ कोटी २४ लाख इतके असून बँकेचा स्वनिधी रु.११ कोटी ७१ लाख इतका झालेला आहे.बँकेने रु.२५० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.
बँकेने इचलकरंजी शहर व परिसरातील बँकेच्या एकूण ६ शाखेतून सामान्य शेतक-यां पासून, छोटे-मोठे व्यापारी,उद्योजकापर्यंत सर्व स्तरातील ग्राहकांच्या गरजा ओळखून आपल्या नियोजनबद्ध व पारदर्शक कार्यपद्धतीमुळे सर्वांच्याच विश्वासास पात्र ठरली असून त्यामुळेच बँकेस सर्वच स्तरावर उत्कृष्ट प्रगती साधता आली आहे असे नमूद केले. बँकेचा सी.आर.ए.आर प्रमाण १८.०९ % इतका भक्कम आहे. ढोबळ नफ्यातून आयकर व अन्य तरतुदी वजा जाता बँकेस रु.९८ लाख २० हजार इतका निव्वळ नफा झाला आहे.
बँकेने सलग तिस-या वर्षी नेट एन.पी.ए चे प्रमाण ०% राखले आहे. बँकेच्या ६ शाखा कार्यरत असून चालू वर्षी आणखी शाखां सुरु करण्याचा मानस आहे. बँकेकडे RTGS/NEFT, SMS Banking, रेशन व गैस सबसिडी, सी.टी.एस.क्लिअरिंग,NACH तसेच Rupay ए.टी.एम कार्ड, Onsite ATM इत्यादी सेवा सुरु असून लवकरच बँक IMPS,UPI तसेच मोबाईल बँकिग सुविधा सुरु करीत आहे.
बँकेच्या सभासद,ठेवीदार,कर्जदार तसेच हितचिंतक यांनी बँकेवर दाखविलेला दृढ विश्वास यामुळेच बँकेच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत असून त्याबद्दल चेअरमन श्री.राजगोंडा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन गजानन लोंढे ,व्यवस्थापकीय मंडळाचे चेअरमन श्री.विलास गाताडे,संचालक इरगोंडा पाटील,चंद्रकांत बिंदगे,कमलाकर पालनकर, बाळासाहेब बरगाले, राजेंद्र शिरगुप्पे, भूषण शहा, राजकुमार पाटील, मधुकर पांढरे, दशरथ मोहिते,व्यंकटेश शहापूरकर,संचालिका श्रीमती.शोभा कडतारे ,सौ.विजयश्री गौड,तज्ञ संचालक संजय व्हनबट्टे,विजय कामत,व्यवस्थापकीय मंडळ सदस्य श्री.आदगोंडा पाटील, श्री.चंद्रकांत पाटील,अॅड.दत्ताजीराव कंदले तसेच जनरल मॅनेजर दिपक काटकर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.