स्व. माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन

शिरोळ: राम आवळे 

दि.१ : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन,माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या पूर्णकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. सा.रे. पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच स्व. दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. दिनकररावजी यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजीत अशोक कदम व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई, अनिलकुमार यादव,बाबासो पाटील,विश्वनाथ माने,शेखर पाटील,बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील,इंद्रजीत पाटील,अमर यादव, निजामसो पाटील, दरगू माने गावडे ज्योती कुमार पाटील, सिद्धगोंडा पाटील,सुरेश कांबळे,संचालिका श्रीमती विनया घोरपडे, सौ संगीता पाटील (कोथळीकर) सौ अस्मिता पाटील, तज्ञ संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, निमंत्रित मलकारी तेरदाळे,बाळासाहेब पाटील(हालसवडे) रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूरखान मिस्त्री,कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील सचिव अशोक शिंदे यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

तसेच या प्रसंगी पंचगंगा कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील,व्हाईस चेअरमन बाबा पाटील, संचालक जयपाल कुंभोजे,जयसिंगपूरचे नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुनकीकर,उद्योगपती अशोकराव कोळेकर,मयूरभाई नारेचनिया,राजू हरळीकर, युवा नेते वरून पाटील जयसिंगपूर, अशोक घोरपडे शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,नगरसेवक विजय आरगे, दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर,गुरुदत्त कारखान्याचे संचालक शिवाजी गावडे व शिवाजी सांगले, शिरोळचे माजी सरपंच बी.जी. माने,दिलीप माने,भगवान कोळी सर, मानसिंग पाटील, बबन पुजारी,कृष्णराव भाट, बाळासो कोळी, बापूसो गंगधर,आयुब मेस्त्री धोंडीराम दबडे त्याचप्रमाणे डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सोशल फाउंडेशन,श्री दत्त कामगार सोसायटी कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, श्री दत्त ग्राहक भांडार या संस्थांचे पदाधिकारी,आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व आयटीआयचे प्राचार्य,प्राध्यापक वर्ग व सर्व पत्रकार बंधू, सभासद कार्यकर्ते, आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.