श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 
दि.७:  नदिवेस येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा  ८ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडणार आहे.
      बुधवार ८ एप्रिल रोजी ग्रामदेवता मान-सन्मान व मंडळ मांडणीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. गुरुवार ९ एप्रिल रोजी मंडळ स्थापना, अग्निस्थापना व देवतांचे हवन करण्यात येणार असून सकाळी आरतीनंतर गुरूचरित्र वाचनास प्रारंभ होईल. पुढील दिवसांमध्ये विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार १० एप्रिल रोजी श्री गणेश याग व मनोबोध याग, शनिवार ११ एप्रिल रोजी चंडी याग, रविवार  १२ एप्रिल रोजी श्री स्वामी याग, सोमवार १३ एप्रिल रोजी गीता याग, तर मंगळवार १४ एप्रिल रोजी रुद्र याग व महारुद्र याग पार पडणार आहेत.
       बुधवार १५ एप्रिल रोजी बली पूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन व देवता विसर्जनाने सोहळ्याची सांगता होईल. या संपूर्ण कालावधीत त्रिकाळ आरती, अखंड नामजप सुरू राहणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
#swami samrth#ichalkaranji#