इचलकरंजी: विजय मकोटे
दि 13 नोव्हेंबर -इचलकरंजी येथील डीकेटीई संस्थेच्या इटीसी विभागातील सौ. अनुष्का काडगे यांनी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग मध्ये विश्वेश्वरैय्या टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, बेळगावी येथून पीएच.डी. डीग्री संपादीत केली. प्रा.अनुष्का काडगे यांनी ‘डिझाईन अँड ऍनालिसिस ऑफ इटेरेटिव्ह डिटेक्शन अल्गोरिथम फॉर मल्टियुजर सिस्टिीम’ या विषयावर डॉ. प्रियतमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संशोधन पूर्ण केले आहे.
या संशोधनाचा उपयोग मोबाईल कम्युनिकेशन क्षेत्रातील ३-जी, ४-जी आणि तसेच नविन येणा-या जनरेशनमधील दूरसंचार उपकरणांमध्ये होईल. मोबाइल नेटवर्क मध्ये वायरलेस कार्यप्रणालीचा उपयोग करुन आवाजाचे सिग्नल दूर अंतरावर पोहोचवले जातात आणि यादरम्यान ऐकू येणा-या आवाजाची गुणवत्ता कमी होते. या संशोधनामध्ये मुख्यत्वेकरुन मोबाइल कम्युनिकेशन क्षेत्रातील आवाजाची गुणवत्ता कशी सुधारली जाईल यावर भर देण्यात आला आहे कि जेणेकरुन मोबाइलला धारकाला क्लिअर आवाज ऐकू येईल. या संशोधनाचे ठळक वैशिष्ठ म्हणजे नेटवर्क मध्ये जरी मोबाइल धारकांची संख्या वाढली तरी सिग्नल ची कॉलीटी राखणे शक्य होणार आहे.
पीएच.डी. डीग्री अर्जित केलेबददल डीकेटीई चे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, सचिव डॉ सपना आवाडे यांनी अनुष्का काडगे यांना शुभेच्छा दिल्या. संशोधनासाठी डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर डॉ.सौ.एल.एस. आडमुठे विभागप्रमुख प्रा.डॉ. एस.ए. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.